Tag: रामचंद्रबुवा दांडेकर
गुडघे गावचा ग्रामोदय
दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...