सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात संवेदनेचे नेटवर्किंग जाणीवपूर्वक साधले तर आज जाणवणाऱ्या अस्वस्थता, असहाय्यता, हतबलता या भावना नष्ट होऊ शकतील आणि एक सुसंस्कृत संवेदनापूर्ण रसिक समुदाय बांधला जाऊ शकेल अशा तऱ्हेचा अभिप्राय ‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संस्थांनी स्वातंत्र्यदिनी योजलेल्या नागरिकांच्या सभेत व्यक्त झाला. मुख्यत: टेलिव्हिजन व सोशल मीडिया यांच्या द्वारा समाजात जो विखार, विषाद व नकारात्मकता अशा भावना पसरल्या जात आहेत त्या दुर्बल भावनांना चांगुलपणाचे, सज्जनतेचे नेटवर्क हेच उत्तर ठरू शकेल अशा शब्दांत सभेचा समारोप झाला...