रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाने हे आमचं बारा वाड्यांचं गाव. आम्ही इथं सेंद्रीय शेती करतो. मी आणि कन्या होळीच्या सणासाठी गावाला आलो आणि लॉकडाऊनचे पडघम वाजायला लागले होळीचा उत्सव, प्रत्येक वाडीत घरोघरी फिरणारी पालखी अशा वातावरणात सगळे दंग असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि आम्ही इथं अडकून पडलो.