Tag: रविन थत्ते
हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल ! – परिचर्चा
जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...
ग्रंथालये नव्हे, सांस्कृतिक केंद्रे ! (Book Libraries will be cultural Centers)
पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला...