Home Tags रतनगड

Tag: रतनगड

ग्रंथालयाने दिली शहाबाज ला उंची! (Library brings Shahabaj Enlightenment)

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावाचा गमतीने उल्लेख ‘रतनगडाच्या पायथ्याशी वसले जे गाव ! पाच पाडे मिळून तयाला दिधले शहाबाज हे नाव !’ असा करतात. शहाबाज गावाला मंदिरांचे गाव म्हणावे इतकी विविध देवतांची मंदिरे तेथे आहेत. पण गावाचे वैशिष्ट्य आहे ती तेथील प्राथमिक शाळा. त्यामुळे गावाची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत गेली. त्या गावाला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव अशी प्रसिद्धी लाभली होती. तेथील वाचन चळवळीला चालना देण्याचा विचार गावातील प्रतिष्ठित मंडळींनी केला आणि त्याबरोबर शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले‌...