Home Tags रंगनाथ पठारे

Tag: रंगनाथ पठारे

कागदावर शिक्षित पिढी! – रंगनाथ पठारे

रंगनाथ पठारे यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात मोलाचे योगदान आहे. ते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 साली स्थापन झालेल्या अभ्यास समितीचे अध्यक्ष होते. ते मूलत: कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही त्यांची महाकादंबरी आहे, जी मराठा समाजाच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडते. त्यांनी संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सदतीस वर्षे अध्यापन केल. पठारे म्हणजे विचार, संवेदना आणि शैली यांचा त्रिवेणी संगम. शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र...

मराठी कम्युनिटी

मराठी (व एकूणच स्थानिक) भाषा व संस्कृती ही मुळात टिकणार कशी हा प्रश्न जाणकार (मराठी) जनांना भेडसावत असतो. त्याच बरोबर भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनाच्या गोष्टीही काही डोक्यांत असतातच. त्याकरता क्रियाशील मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या तऱ्हांची कामे करत असतात. मराठीतील पाच संस्थांमार्फत आम्ही असे ठरवत आहोत, की जगातील साऱ्या कर्तबगार मराठी जनांना, त्यांच्या कार्याला एका सांस्कृतिक दुव्याने जोडून घ्यावे – त्यांच्याकडील माहितीचे व ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे आणि अशा तऱ्हेने मराठी माणसाचे शक्तिसामर्थ्य प्रकटावे...

मराठी – अभिजात भाषा !

5
भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...

अफलातून भालचंद्र नेमाडे

प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्‍हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...