Home Tags म्हार्दोळ

Tag: म्हार्दोळ

हृदय सजल करणारा- राग हंसध्वनी

0
माझी आच संगीतातील हंसध्वनी रागाकडे नाळ बांधल्याप्रमाणे घट्ट जोडलेली आहे. हंसध्वनीवर आधारलेली लकेर वा धून कानावर पडली की आत काही तरी कारंज्यासारखे थुईथुई उल्हसित झाल्यासारखे वाटते. हंसध्वनी राग वृक्षासारखा डोलारा असावा असा नाही. लिंबाच्या झाडासारखा असेल. पिंडातील आतील काही रसायने वा प्लेट्स ‘हंसध्वनी’च्या स्वरांना चुंबकीय गतीने आकर्षित व्हाव्यात तसे मला होते. जीव मोहरून जातो. हंसध्वनी हे नावच मला आवडते. हंस म्हणजे आत्मा. हंस-ध्वनी म्हणजे आत्म्याचा ध्वनी, आतील आवाज असा अर्थ. हंसध्वनी आणि शंकरा हे राग एकमेकांपासून वेगळे ओळखण्यास सोपे नाहीत...