Tag: मेजर मॅकेन्झी
परतवाड्याचे सार्वजनिक वाचनालय
शंकर वामन गुरूजी यांनी परतवाड्यात वाचनप्रेमींना एकत्र आणून वाचनालयाची मुहूर्तमेढ 6 सप्टेंबर 1866 रोजी रोवली. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. त्याला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. वाचनालयाच्या स्थापनेत इंग्रज अधिकारी मेजर मॅकेन्झी यांचा पुढाकार होता. परतवाड्यात इंग्रज सैन्याची छावणी होती. तेथे इंग्रज अधिकारी असत. परतवाडा हे अचलपूरचे उपनगर म्हणावे असे गाव आहे. परंतु तेथील इंग्रज सैन्याच्या छावणीमुळे त्यास काही काळ महत्त्व अधिक लाभले. खुद्द अचलपूरचे वाचनालयही स्थानिक प्रयत्नांतून 1893 मध्ये सुरू झाले...