मुधोजीराजे यांच्याकडे फलटण संस्थानाची गादी 10 फेब्रुवारी 1860 रोजी आली. मुधोजीराजे हे कार्यक्षम आणि तळमळीचे राजे होते. त्यांनी फलटणला एक आदर्श संस्थान 1860 ते 1916 या कालावधीत बनवले. मुधोजीराजे हे विसाव्या शतकातील पहिले राजे. महाराष्ट्रात आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला त्या काळात आरंभ झाला होता. इंग्रजी शिक्षण घेतलेले नवशिक्षित, सुधारकी विचारांचे तरुण समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या खटपटीत होते. मुधोजीराजांनी बदलत्या काळाची पावले ओळखून संस्थानात बदल सुरू केले. त्यांच्या काळात फलटणच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला गेला...