Home Tags मुणगे गाव

Tag: मुणगे गाव

carasole

मुणगेची श्री भगवतीदेवी – आदिमायेचा अवतार

कोकण हे देवभूमी म्हणून मान्यता पावले आहे. त्याची निर्मिती भगवान परशुरामाने केली अशी लोकांची दृढ धारणा आहे. तेथे पावलोपावली विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी अनेक देवदेवतांची मंदिरे पाहण्यास मिळतात. ती तेथील श्रद्धा व संस्कृती यांचे प्रतिक आहे. प्रत्येक गावात ग्रामदैवत असणे हा तेथील भाविकतेचा स्थायीभाव असून, परमेश्वरी शक्तीची विविध रूपात भक्तीभावाने व श्रद्धेने जोपासना केली जाते. आजही तेथे अस्तित्वात असणाऱ्या गावरहाटीच्या अधीन राहूनच सर्व धार्मिक सण, उत्सव व व्रतवैकल्ये साजरे करण्याची परंपरा पाळली जाते. ती मंदिरे माणसांना परस्परांशी जोडण्याचे काम नकळत करत असतात...

मुणगे गावचा आध्यात्मिक वारसा!

मुणगे हे मालवण आणि देवगड तालुक्याच्या सीमेवरील गाव. ते मोडते देवगड तालुक्यात. गावाच्या एका बाजूस अथांग अरबी समुद्र असून सागरी महामार्गावरून आचरे ते कुणकेश्वर...