मी संकेत आणि मधुरा ओक यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि मला, माझ्या गेली पंधरा-वीस वर्षें छळणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यासारखे वाटले. ती दोघे डोंबिवली-ठाणे-कल्याण येथे वेध अॅक्टिंग अकॅडमी चालवतात. अभिनय व इतर कलाविष्कार शिकवणारे अनेक भुरटे अभ्यासक्रम, कार्यशाळा, शिबिरे यांच्याबाबत लोकांनी ऐकलेले असते.