बारावे साहित्य संमेलन मुंबई येथे 1926 साली साजरे झाले. ते अकराव्या संमेलनानंतर पाच वर्षांनी भरले होते. त्याचे अध्यक्ष सरदार माधवराव विनायकराव किबे होते. साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांच्यासारखा चतुरस्र अध्यक्ष झाल्यावर पुढील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किमान उत्तम साहित्यिक असावा अशी अपेक्षा होती. पण सरदार किबे यांचे नाव साहित्य क्षेत्रात त्या तोडीचे मानले गेले नाही.