Tag: माणगाव
नागाव (गोरेगाव) : सामाजिक एकोप्याची अजब कहाणी (Nagaon : Story of Social integration)
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नागाव (गोरेगाव). ते महाड-गोरेगावचे उपनगर वाटावे असे आहे. आमच्या गावाचा परिसर हा कातळी. त्यामुळे आंबा, फणस, नारळी यांच्या बागा… असा कोकणचा मेवा तेथे नाही. तेथे भातशेती ही मुख्य; रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणत ना ! उन्हाळ्यात कलिंगड, टरबूज ही फळे येत; पावसाळी भाज्या भरपूर होत. गावात असतील दोनशे घरे. गावाची समाजरचना जमीनदार आणि खंडकरी शेतकरी, अशी. त्यामुळे ती शेती आम्ही आमच्याच गावातील कुणबी-मराठा यांच्याकडे ‘अधेली’ने दिली होती...