Home Tags महिकावतीची बखर

Tag: महिकावतीची बखर

महत्त्वाच्या काही बखरी (Few significant Marathi Bakhar)

0
मराठी साहित्यात मराठीच्या इतिहासाच्या दृष्टीने काही बखरींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांची वर्णनात्मक नोंद या लेखात केली आहे. सभासद बखर, सप्तप्रकरणात्मक बखर, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची बखर (कैफियत), महिकावतीची बखर अशा एकूण सुमारे दोनशे बखरी लिहिल्या गेल्या असाव्यात. मराठीतील अधिकतर बखरी 1760 आणि 1850 या कालावधी दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत. बखरींचे लेखन सर्वसामान्यपणे कोणा तरी राजकीय पुरुषाच्या आज्ञेवरून झालेले असते. मुसलमानी तबारिखांचा तो परिणाम असावा...

ऐतिहासिक महत्त्वाच्या बखरी (Bakhar – Literary form of historical writing)

0
बखर हा ऐतिहासिक, विशेषकरून मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा लेखनप्रकार आहे. ‘बखर’ या शब्दाचा कोशातील अर्थ हकिगत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र असा आहे. गद्यात लिहिलेला ऐतिहासिक वृत्तांत असा अर्थ, पुढे त्याला प्राप्त झाला. हा शब्द ‘खबर’ (वार्ता, माहिती) या फारशी शब्दापासून वर्णविपर्यासाने बखर असा तयार झाला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या, त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेचे वर्चस्व होते हे लक्षात घेता वरील व्युत्पत्ती बरोबर असावी असे वाटते. बखरींत ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन वाचण्यास मिळते...