Tag: महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था
चंदा निंबकर यांचे मेंढीचे नवे वाण
चंदा निंबकर यांनी ‘निंबकर कृषी संशोधन संस्थे’च्या पशू संवर्धन विभागात कामाला 1990 पासून सुरुवात केली. त्यांना मेंढीच्या जातीचा शोध घेत असताना पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागातील मेंढीची जात ‘गरोळ’ ही सापडली. त्यांनी गरोळ मेंढ्यांचा कळप फलटण येथे आणून त्यांची पैदास व संवर्धन केले. त्यांनी 1998 पासून वीस वर्षे सातत्याने संशोधन करून जुळी कोकरे देणाऱ्या ‘नारी सुवर्णा’ या मेंढीच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे...