महेश म्हात्रे हा तरुण, अभ्यासू पत्रकार आहे; स्वाभाविकच त्याने दैनंदिन बातम्यांवर आधारित पत्रकारिता सोडून संशोधनाकडे मोर्चा वळवला आहे. त्याने पत्रकारितेचा बाज सोडला नाही. त्यामुळे महाराष्ट्र रिसर्च सेंटर या, त्यानेच सुरू केलेल्या संस्थेमार्फत महाराष्ट्राबाबतची सामाजिक-राजकीय सत्याधिष्ठित माहिती संकलित केली जाते. त्यांवर आधारित अहवाल सादर केले जातात. महेशने वेगवेगळ्या शिष्टमंडळांच्या माध्यमांतून अनेक देशांचे दौरे केले आहेत. तो ‘टेड टॉक्स’ या इंग्रजीतील गाजलेल्या भाषण मालिकेत अवतरलेला एकमेव मराठी भाषक संपादक आहे. अहमदाबाद येथील दुर्दैवी घटनेनंतर त्याचे वार्तांकन करणाऱ्या सर्वच मराठी पत्रकारांनी ‘कोसळले’ या शब्दाला प्राधान्य दिलेले दिसले. ‘एअर क्रॅश’ या शब्दाचे भाषांतर करताना केलेले ‘विमान कोसळले’ हे भाषांतर चुकीचे नाही. पण मराठी भाषेत एवढे वैविध्य असतानाही माध्यमे कोणतेच भाषिक वैविध्य वापरणार नसतील तर, ते भाषिक भविष्यासाठी चांगले लक्षण नाही...