माणसाचे आयुष्य त्याला कोठे घेऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. सम्राट अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात ज्या राजा मानसिंग यांचा सिंहाचा वाटा होता, त्या मानसिंग यांच्या आयुष्याची अखेर विदर्भातील अचलपूर या एका छोट्या शहरात झाली. मानसिंग अकबराच्या नवरत्नांपैकी एक मानले जात...