Tag: मनोरंजन
सद्भावनेचे व्यासपीठ
माणसे माणसांशी चांगुलपणाने वागत आहेत; छोटी माणसे मोठी कामे उभी करत आहेत. आजही माणसे इतरांच्या भल्यासाठी धडपडत आहेत. समाजातील भलेपणा जपू पाहत आहेत. अशा व्यक्ती समाजात दहा टक्केच असतात, परंतु त्यांचा प्रभाव एकूण समाजावर भासतो तेव्हा एकूण समाजाच्या सद्भावनेची शक्ती जाणवते, त्याच समाजशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ आहे. येथे जे जे चांगले आहे ते ते नोंदले जाईल...