Tag: मंथन
कोरोना – चीनचे कारस्थान?(Corona – China’s Conspiracy)
कोरोना चीनमध्ये उद्भवला, जगभर पसरला, आता स्थिरावला. म्हणजे त्यामुळे देशोदेशांची जी अवस्था झालेली आहे, ती अटळ आहे; त्या देशांचा विचार व कारवाई ती अवस्था कशी सांभाळायची, अधिक बिघडू द्यायची नाही हे सर्व देशांनी स्वीकारले आहे.
कोरोना – चीनची मात; भारतास संधी! (Corona- India’s Opportunity)
कोरोना साथीचा आरंभ चीनमध्ये झाला. तो कसा झाला? केव्हा जाहीर झाला? याबद्दल विवाद आहेत. खरे तर, तो सोशल मीडियावरून भारतात कळला. भारतानेच नव्हे, तर साऱ्या जगाने तो चीनचा स्थानिक प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले.
शेतकऱ्यांच्या पायांत कायद्याच्या बेड्या…!
जनतेने मुळात समजून घेतले पाहिजे, की घटना आणि कायदे हे शासकीय लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा यांना नियंत्रण करण्यासाठी आहेत; नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी नाहीत. मात्र सामाजिक स्वास्थ्य टिकून राहवे म्हणून जे कायदे-नियम आहेत ते जरूर नागरिकांसाठी आहेत.
साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
दलित ही आहे विद्रोही सांस्कृतिक संज्ञा
न्यायालयांची भूमिका ‘दलित’ या शब्दाऐवजी ‘अनुसूचित जाती’ असा उल्लेख शासकीय कागदपत्रांमध्ये करावा अशी आहे. ती प्रशासन चालवण्याच्या दृष्टीने समजण्यासारखी आहे. न्यायालयाने म्हटले आहे, की ‘दलित’ या शब्दातून ‘शोषित’, ‘पीडित’, ‘दडपलेले’ असे अर्थ व्यक्त होतात, त्यामुळे तो शब्द अपमानजनक आहे, समूहाच्या दुर्बलतेकडे, दुय्यमत्वाकडे इशारा करणारा आहे. न्यायालयाचे प्रतिपादन वर वर पाहता रास्त वाटते; पण केंद्र व राज्य सरकारे जेव्हा केवळ शासकीय व्यवहारातून नव्हे तर, एकूणच, समाजाच्या सार्वजनिक पटलावरून ‘दलित’ हा शब्द गायब करण्याचे धोरण अहमहमिकेने राबवू पाहताना दिसतात...