Tag: भालचंद्र नेमाडे
कोलटकरांच्या भिजकी वहीची नवी आवृत्ती
अरुण कोलटकर यांच्या ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन 20 डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईतील गोरेगाव येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मध्ये रसिकांच्या गर्दीत झाले. ज्ञानपीठ सन्मानित भालचंद्र नेमाडे आणि ‘प्रास’चे जनक अशोक शहाणे हे दोघे प्रमुख पाहुणे होते. रेखा शहाणे आणि अंबरीश मिश्र यांचे नियोजन नेटके व प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते...
जीवनशैलीतील दूरदृष्टी
“भाषांतर म्हणजे जे आपल्या भाषेत नसतं, समाजात नसतं ते दुसरीकडून आणणं. तरच आपण त्यांच्यासारखे होतो,” भाषांतराविषयीचे असे चिंतन भवरलाल जैन यांनी साहित्य अकादमीच्या जैन हिल्स येथील भाषांतर कार्यशाळेत मांडले. भवरलाल एक कष्टाळू, निष्ठावंत शेतकरी, पण त्यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात केलेले काम अजोड आहे...
अफलातून भालचंद्र नेमाडे
प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...