विनीत पद्मावार गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयनगुडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत. भामरागड हा आदिवासीबहुल तालुका. तेथील आदिवासीपाड्यांत माडिया ही बोलीभाषा बोलली जाते. मुलांना प्रमाणभाषा समजत नाही. त्यामुळे शिक्षणात मुख्य अडसर भाषेचा येतो.