Tag: भाद्रपद
गणेशोत्सव – रामदासांचा साक्षात्कार !
गणेशोत्सवाला 2022 साली तीनशेसेहेचाळीस वर्षे पूर्ण झाली. गणपती हा सर्व कार्यांत प्रथम पूजला जातो. ‘सुखकर्ता दुःखहर्ता...’ ही गणपतीची आरती रामदास स्वामी यांनी रचली आहे. त्यांनीच गणेशोत्सवाची कल्पनाही राबवली. याबाबतची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे...
शिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव
संतकवी रामदास स्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांबद्दल आदर होता. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, संस्कृती रुजावी यासाठी शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार ते माघ शुद्ध पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला...
महालय – पितृ पंधरवडा
भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ. हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते, म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधररवडा असतो...