अंबरनाथचे ‘गुरुकुल’ केवळ शिक्षण देत नाही, ते विद्यार्थ्याला समजून घेते, घडवते आणि आयुष्यातील प्रत्येक वळणासाठी तयार करते. असे म्हणता येईल की ‘गुरुकुला’त आयुष्य शिकायला मिळते ! गुरुकुल हा भाऊसाहेब परांजपे विद्यालयाचा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. तेथे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आणि अर्थातच पालकांच्या संमतीने प्रवेश घेतात. ‘गुरुकुला’त शाळा बारा तासांची होते ! नित्याचे वर्ग पाच तासांचे आणि गुरुकुलातील विशेष संस्कार शिक्षण सात तासांचे. पण गंमत अशी की तेथे शिकणाऱ्या मुलांना शिक्षणाचा तो जादा वेळ म्हणजे ओझे वाटत नाही...