‘दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी’ ही आरती चुकीच्या पद्धतीने अनेकदा म्हटली जाते, कारण त्या रचनेचा अर्थ माहीत नसतो, त्यामागील संकल्पना माहिती नसते. त्या आरतीमध्ये कवीने मांडलेला विचार मुळातून समजून घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय अशी ती आरती आहे. तेलंगणातील नरहर मालुकवी यांची ती रचना आहे...