सूथबी या जगप्रसिद्ध लिलाव कंपनीने थॉमन व विलियम डॅनियल या काका-पुतण्यांच्या जोडीने लिहिलेल्या प्रवासवर्णनपर पुस्तकाची विक्री केली आणि लिलावात त्या पुस्तकाला तीन लाख सदतीस हजार पौंडांहून अधिक (भारतीय चलनात दोन कोटी सत्तर लाख रुपये) एवढी किंमत आली !...
मला माझ्या प्रवासवर्णने वाचण्याच्या आवडीमुळे काही शोध लागले. जसे, की -मराठीतील पहिले प्रवासलेखन गोडसे गुरुजींचे ‘माझा प्रवास’ हे नाही; -राघोबादादा यांनी त्यांच्या हणमंतराव नावाच्या कारभाऱ्यांना इंग्रजांची मदत मिळते का ते पाहण्यासाठी इंग्लंडला 1761 मध्ये पाठवले होते. इतर देशांतील प्रवासी हिंदुस्थानात त्याआधी काही शतकांपासून येत होते. त्यांनी ते सिद्ध करणारी प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत...
मराठी ऐतिहासिक चित्रपटच जणू!
पिवळसर, जीर्णशीर्ण पानांचे, छोटेसे एक पुस्तक हा माझा आयुष्यातील शंभर टक्के खात्रीलायक विरंगुळा होता. त्या पुस्तकाची भेट हा अनुभव प्रत्येक वेळी...
भोर हे एकेकाळचे पुणे प्रांतातील (दख्खन प्रांतातील) मोठे संस्थान. आकाराने औंध संस्थानच्या दीडपटीहून मोठे. त्या संस्थानाच्या राजांना नऊ तोफांची सलामी होती. संस्थानचे त्यावेळचे राजे...
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...
पाऊणशे वर्षांपूर्वी, प्रवास व त्यातूनही विदेशप्रवास कारणपरत्वेत – मुख्यतः शिक्षणासाठी- होत असे. असाच प्रवास डॉ. पां. वा. काणे (हिंदू धर्मशास्त्राचे पंडित व पहिल्या ‘भारतरत्नांपैकी...
कमला फडके आणि प्रसिद्ध मराठी लेखक ना.सी. फडके यांनी त्रिवेंद्रम येथे भरलेल्या एका ‘फिलॉसॉफी’ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने डिसेंबर १९४५ मध्ये प्रवास केला. परिषदेत...
“निरनिराळ्या देशांत प्रवास करून तेथील सृष्टिसौंदर्य व लोकस्थिती पाहणे, शिकार करणे वगैरे गोष्टींची मला फार आवड असल्यामुळे मी माझ्या आयुष्याचे बरेच दिवस युरोप, अमेरिका,...