Tag: प्रभात फिल्म कंपनी
पोस्टर व बॅनर चित्रकला लोपली !
घराणी सिनेमाक्षेत्रात अनेक होऊन गेली; अजूनही आहेत. सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय ही क्षेत्रे कमीजास्त ग्लॅमरची; लोकांच्या मनी आकर्षण असलेली. परंतु त्या कलावंतांची तशी प्रसिद्धी करणारे जे चित्र कलाकार पडद्यामागे काम करतात ते मात्र दुर्लक्षित राहतात, उपेक्षित असतात. चित्रपटनिर्मितीचे श्रेय दादासाहेब फाळके यांचे. पण चित्रपटाला वास्तववादी चौकट दिली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी. पोस्टर व बॅनर चित्रकलेतील 1924 ते 1989 ही पासष्ट वर्षे म्हणजे रंगरेषांचा ‘महायज्ञ’च होता. तो 1990 नंतर निवांत झाला, असे वर्णन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी सुबोध गुरुजी यांनी संकलित केलेल्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे. सुबोध गुरुजी यांनी स्वत: त्यास ‘मानवी स्पर्श संपला’ असे समर्पक रीत्या म्हटले आहे...
नलिनी तर्खड – मूकपटाच्या काळातील नायिका : यशापयशाची सापशिडी
नलिनी तर्खड मध्यप्रदेशातील माळवा पट्टयातून आल्या. त्या पदवीधर होत्या. खानदानी आकर्षक चेहरा ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांचा आवाजही चांगला होता, परंतु त्यांनी गायनाची...