Tag: पेव
दारफळची धान्याची बँक
जेथे पैशाचे सर्व व्यवहार होतात, ती बँक असे प्रत्येकाच्या मनात असते. पण सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ या गावी ‘धान्याची बँक’ आहे. दारफळ हे गाव माढ्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. ‘राष्ट्र सेवा दला’च्या संस्कारात वाढलेले व साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित झालेले असे ते गाव. उमराव सय्यद या मुस्लिम तरुणाने दारफळ गावात ‘राष्ट्र सेवा दला’ची मुहूर्तमेढ 1940 मध्ये रोवली...