Tag: पुणे
कोरोना – किती काळ? (Corona – How Long?)
कोरोनाहे एक अटळ वास्तव म्हणून लोकांनी आता स्वीकारले आहे. त्या संबंधातील चर्चा दोन मुद्द्यांभोवती फिरताना दिसते. म्हणजे आर्थिक मंदी, सामाजिक-सांस्कृतिक संभाव्य बदल हे प्रश्न भविष्यावर सोडून देऊन सध्या लोकांना त्रस्त करणार्या दोन गोष्टी कोणत्या?
प्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा? (Domestic Violence)
कोरोनाच्या बरोबरीने जगभर फैलावलेली आपत्ती म्हणजे घरगुती हिंसाचार (डोमेस्टिक व्हॉयलन्स). तो विषय देशोदेशी चिंतेचा बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याबाबत सावधान असण्याची गरज व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये बायकोला छळणाऱ्या नवऱ्यालाच क्वारंटाईन करण्याची सजा फर्मावली गेली आहे.
सौमित्रला ‘मर्क’चा मुकुट! (Soumitra Athavale’s Success)
पुण्याचा सौमित्र आठवले पुण्याच्याच आयसरमधून बीएसएमएस (म्हणजे एम एस्सी) होऊन अमेरिकेतीलशिकागोजवळ अर्बाना शँपेन येथील विद्यापीठात(युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय) रसायनशास्त्रात पीएच डी करण्यास गेला.
ट्रेण्डी पुणेरी पगडी (Trendy Puneri Pagdi)
डोक्यावर फेटा किंवा पगडी घालण्याची गरज ऊन, वारा, पाऊस; तसेच, शत्रूंच्या वारापासूनही (हल्ला)डोक्याचे रक्षण व्हावे म्हणून भासली असावी. ती गरज नंतर परंपरा म्हणून मान्यता पावली. पुरुष डोक्यावर पगडी, फेटा, मुंडासे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. पगडी पुढे पुरुषांच्या समाजात असलेल्या दर्ज्याचेमानक बनली.
दिनकर गांगल
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे दहा वर्षांपासून मुख्य संपादक आहेत. ते तीन महिन्यांपूर्वी ऐंशी वर्षांचे झाले. त्यामुळे ते बॅकसीट घेऊन तरुणांच्या हाती सूत्रे सोपवणार आहेत. मात्र ते घरी राहून सर्व प्रकारचे सहकार्य आणि लेखांचे संपादन करणार आहेत.
शिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)
शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे...
पाचवे साहित्य संमेलन – 1907
रावबहादूर विष्णु मोरेश्वर महाजनी हे पाचव्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. पाचवे संमेलनही पुणे येथे 1907 साली भरले होते. विष्णु मोरेश्वर महाजनी यांचे सारे आयुष्य...
चौथे साहित्य संमेलन – 1906
न्यायमूर्ती गोविंद वासुदेव कानिटकर हे चौथ्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. ते संमेलन पुणे येथेच 1906 साली भरले. गोविंद वासुदेव कानिटकर यांचा नावलौकिक साहित्य, संगीत आणि विद्या या तिन्ही क्षेत्रांत होता. ते चित्रकलेचे चाहते होते. त्यांचा अभ्यास वेदांताचा व इंग्रजी वाङ्मयाचा होता. ते साक्षेपी विद्वान म्हणून ख्यातकीर्त होते...
दुसरे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1885)
दुसरे ग्रंथकार संमेलन 1885 साली, म्हणजे पहिल्या ग्रंथकार संमेलनानंतर सात वर्षांनी भरले. मधील सहा वर्षें काहीही घडले नाही! दुसरे संमेलनही पुण्यात सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात भरले. ते पुण्यात 28 मे 1885 रोजी भरले. त्या संमेलनास अडीचशेच्यावर ग्रंथकार उपस्थित होते. त्या संमेलनासाठी पुन्हा पुढाकार घेतला तो महादेव गोविंद रानडे यांनीच...
वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...