अरुण महाजन हा तुर्कस्थानातील ‘अरारट’ या पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठणारा तरुण. तो तेथे पोचलेला बहुधा पहिला व एकमेव मराठी तरुण असावा. महाराष्ट्रीय तरुण जगात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या बुद्धीची, पराक्रमाची चुणूक वेगवेगळ्या क्षेत्रांत दाखवतात. पण गिर्यारोहणाचे क्षेत्र सर्व धाडसी तरुणांना मोहवते असे जाणवते आणि तेथील आव्हानेही अगदीच वेगळी असतात ! तेथे अंगात धाडस, हिंमत असणे गरजेचे आहेच; शिवाय, जोखीम पत्करण्याची मनस्थिती असावी लागते आणि पैसा व वेळ, दोन्ही बरेच आवश्यक असतात. अरुण महाजन हा उमदा मराठी तरुण इलेक्ट्रिकल आणि संगणक या दोन शाखांमधील पदवीधर आहे, तो आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या तो कॅलिफोर्नियातील ‘पालो अल्टो’ या शहराचा निवासी आहे...