मराठी साहित्यात मराठीच्या इतिहासाच्या दृष्टीने काही बखरींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांची वर्णनात्मक नोंद या लेखात केली आहे. सभासद बखर, सप्तप्रकरणात्मक बखर, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची बखर (कैफियत), महिकावतीची बखर अशा एकूण सुमारे दोनशे बखरी लिहिल्या गेल्या असाव्यात. मराठीतील अधिकतर बखरी 1760 आणि 1850 या कालावधी दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत. बखरींचे लेखन सर्वसामान्यपणे कोणा तरी राजकीय पुरुषाच्या आज्ञेवरून झालेले असते. मुसलमानी तबारिखांचा तो परिणाम असावा...