नदीचे पुनरुज्जीवन सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही! तोच विचार मनात ठेवून आम्ही जीवितनदी संस्थेतर्फे, 'दत्तक घेऊया नदीकिनारा' ही योजना 2017 साली सुरू केली.
पुण्याजवळचे पानशेत येथील धरण 12 जुलै 1961 रोजी फुटले. ते मुठेची उपनदी अम्बी हिच्यावर त्यावेळी नुकते बांधले होते. ते खडकवासला साखळी योजनेतील धरण असल्याने, पानशेत धरण रिकामे होऊ लागल्यावर ते पाणी खडकवासला धरणात जमा झाले.
पुण्याच्या शिरूर व हवेली या तालुक्यांतील काही मंडळींनी देशी पद्धतीची झाडे लावण्याचा आणि ती कोणत्याही परिस्थितीत जगवण्याचा प्रयत्न गेली पाच वर्षे चालवला आहे. त्यामधून पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शक ठरेल असेच काम उभे राहिले आहे.
'सरोवर संवर्धिनी' हा नवा, अजून फारसा न रुळलेला उपक्रम आहे. त्याचे स्वरूप ठिकठिकाणच्या लोकांनी त्या-त्या ठिकाणी एकत्र येऊन, तेथील जलस्रोतांची काळजी घेऊन जलसंवर्धनाच्या दृष्टीने आखलेला कृती आराखडा असे आहे...
स्टॉकहोम जलपुरस्कार माधव चितळे यांना 1993 मध्ये मिळाला. तो नोबेल पुरस्कारच मानला जातो. तो भारतात प्रथमच मिळत होता, तोही मराठी माणसाला! त्यामुळे आम्ही 'विज्ञानग्रंथाली'तर्फे त्यांचा सत्कार व त्यांची मुलाखत असा कार्यक्रम मुंबईत योजला. भा.ल.महाबळ व मीना देवल यांनी मुलाखत घेतली.
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचे वरदान आहे. कोल्हापूर शहराचा सरासरी पाऊस एक हजार पंचवीस मिलिमीटर, सर्वात कमी - 543.5 मिलिमीटर (1972 साली) तर सर्वात जास्त -...
‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’
भारतीय समाज आणि संस्कृती यांची पायाभरणी गंगा-यमुना-सिंधू या नद्यांच्या साक्षीने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
आरे वसाहतीमधील झाडे आणि मुंबई मेट्रोची कारशेड यांवरून मुंबईकरांमध्ये दोन तट पडून गेले काही आठवडे चांगलीच जुंपली होती. काही लोकांनी उच्च न्यायालयात तीन-चार मुद्दे...