Tag: परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि कोमसाप आयोजित पारितोषिक वितरण समारंभ
तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेसह आठदहा नवे प्रवाह सध्या प्रचलीत आहेत. त्यामुळे जगभर अपार संधी आहेत. विद्यार्थ्यांनी ते प्रवाह जाणून घ्यावेत आणि जगभर जाण्याचा मार्ग पत्करावा, त्यात त्यांचा उत्कर्ष आहे असे आवाहन अमेरिकास्थित आय टी तज्ज्ञ राकेश भडंग यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना केले. निमित्त होते अण्णा शिरगावकर यांच्या स्मरणार्थ योजलेल्या माहिती संकलन स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचे. ही स्पर्धा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि कोमसाप यांनी संयुक्त रीत्या घेतली होती. तिला सहाय्य पुण्याच्या ‘परिमल आणि प्रमोद चौधरी प्रतिष्ठान’चे लाभले...
फलटणचा संस्कृतिशोध !
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...