Tag: पखवाज
पखवाजपटू गार्गी शेजवळ (Pakhwaj Player Gargi Shejwal)
भारतातील पखवाजवादकांचे पहिलेच पखवाजपर्व भोपाळमध्ये 2013 साली आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात पखवाजवादन करणारी गार्गी ही पहिली महिला कलाकार होती. पखवाजपर्व धृपद संस्थान भोपाळ न्यास आणि डीडी भारती यांच्या वतीने भरले होते. गार्गी देवदास शेजवळ ही महाराष्ट्राची. गार्गी मुंबई, पुणे; तसेच, भारतातील विविध ठिकाणी तिच्या गुरूंसोबत पखवाजवादन करत असते.