भारतातून दक्षिण आफ्रिकेत आणि तेथे बारा वर्षे राहिल्यानंतर, दोन लहान मुलांना घेऊन न्यूझीलंडला येण्याचा निर्णय म्हणजे भलतेच धाडस होते, आमच्यासाठी! पण न्यूझीलंडसारख्या सुरक्षित देशात स्थायिक व्हावे असे आम्हाला वाटले आणि त्या दृष्टीने नोकरी, व्हिसा असे सगळे सोपस्कार करून न्यूझीलंडमध्ये ऑकलंड या गावी आलो; बघता बघता, त्याला तीन वर्षेही झाली...