मृणाल गोरे यांच्या स्मृतिदिनी, 17 जुलैला तिकडे दूर आसामात, गौहत्ती येथे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी रंगमंचावर हिंदी भाषेत सादर होत आहे ! त्याचे लेखन केले आहे मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी आणि सादरकर्त्या आहेत कन्नड भाषिक भागीरथी कदम. त्या राष्ट्रीय पातळीवर मानसन्मान मिळवलेल्या अभिनेत्री- दिग्दर्शक आहेत. सध्या त्या गौहत्तीमधील नाट्य विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावतात. त्यांच्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग भारतात विविध ठिकाणी होत आहे. मृणाल गोरे यांची जीवनकथा त्याच प्रकारे भारतभर सादर होण्याची शक्यता आहे...