रमेश बाळापुरे यांचा जन्म झाला तो मुळी बाविशी नाट्यमंदिरात. रमेशला त्याच्या तरुणपणीही बाविशीचे स्टेज अनायासे प्राप्त झाले ! रमेशचे मामा लगदेमास्तर हे नाटकात कामे करत. रमेशमध्ये नाटक असे अनुवंशिकतेने उतरले होते. रमेशला निसर्गानेसुद्धा मदतच केली. त्याला प्रमाणबद्ध उंची, मोठे आकर्षक डोळे, हसरा चेहरा अशी शारीरिक संपत्ती लाभली. रमेश आणि मी नाटकातील जोडगोळी बनलो. रमेशने नाटक निवडावे- दिग्दर्शित करावे आणि मी त्यात विनोदी भूमिका करावी असा परिपाठ झाला...