अशोक लिंबेकर यांचे लेखन व्यापकत्व धारण करत आहे. त्याची झलक त्यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे' या ललित लेखसंग्रहातून पाहण्यास मिळते. ते मलपृष्ठावर लिहितात, लहान मुलाच्या निरागस डोळ्यांनी पाहिलेले ते गाव, रान-शिवार, निसर्ग आणि त्यातील अनेक घटक हा या लेखांचा विषय आहे...
मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.
नाटककार अशोक समेळ हे नाव मराठी रंगभूमीचा 1980 नंतरचा इतिहास लिहिताना प्रामुख्याने घ्यावे लागेल. समेळ यांची नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मराठी नाट्यसृष्टीत गेली चाळीस वर्षे सातत्याने कामगिरी आहे. अशोक समेळ यांनी तरुणपणी नट म्हणून एण्ट्री 'पुत्रकामेष्टी' या