Tag: नांदोरा गाव
चंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे
मनोहर सप्रे त्या वेळेस तीस-बत्तीस वर्षांचे असतील, ते एके दिवशी मुलांसोबत जंगलात फिरत असताना, मुलांनी रस्त्यालगतचा एक लाकडी ओंडका उचलला. सप्रे यांना त्या लाकडात आकार दिसला! त्यांनी ते लाकूड घरी आणले. त्यांनी त्या लाकडाला कल्पकतेने थोडा आकार देऊन, त्यातून एक शिल्प साकारले - ‘आईचे व मुलाचे’! सप्रे यांना ते ‘जिवंत झालेले’ शिल्प खूप आवडले. झाले! सप्रे यांना मार्ग सापडला. ते त्यांचे पहिलेवहिले शिल्प...