संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन हा स्वतंत्र भारतातील एक ऐतिहासिक संघर्ष मानला जातो. अमरावती जिल्ह्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. अगदी रामराव देशमुख यांनी महाविदर्भ संकल्पना स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून मांडली होती. त्यामुळे जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली होती. पुढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने जनमत वाढले. अमरावती जिल्ह्यातील डाव्या विचारांची पुरोगामी मंडळी आणि काँग्रेसमधील संयुक्त महाराष्ट्रवादी नेते यांनी ती चळवळ गतिमान केली. अमरावती जिल्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र विदर्भात बनला...