Home Tags देणे समाजाचे

Tag: देणे समाजाचे

नाना साठे प्रतिष्ठान : पुढे नेण्यासाठी वारसा (Passing on the legacy)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे घर, स्वतःची नोकरी आणि व्यवसाय या परिघाबाहेर सहसा कोणी जात नाही, कारण ते सारे एकत्रितपणे सांभाळणे हीच तारेवरची कसरत असते ! परंतु या विधानाला काही अपवाद असतात. ठाण्यातील कौस्तुभ साठे हे त्यांपैकी एक. ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ या कंपनीमध्ये ‘पोर्टफोलिओ मॅनेजर’ या पदावर कार्यरत असणाऱ्या कौस्तुभ साठे यांचे त्यांच्या समाजकार्याबद्दलचे हे मनोगत...
carasole

वीणा गोखले – देणे समाजाचे

2
आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना, त्यावर मार्ग शोधत असताना, उपाय करत असताना, अगदी अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होते! पुण्याच्या वीणा गोखले यांच्या बाबतीत असेच झाले. वीणाला जुळ्या मुली. त्यांपैकी एक नॉर्मल व दुसरी स्पेशल चाईल्ड – जन्मापासून अंथरुणाला खिळलेली मुलगी. या मुलीला कसे सांभाळायचे? तिच्यावर काय उपचार करायचे? कसे करायचे? कुठे करायचे? यासाठी वीणा व तिचे यजमान दिलीप हे वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन येत असत. पुण्यातील, पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील ठिकाणी जात असत. संस्था पाहून आल्यावर, त्यांविषयी आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्यांच्या कार्याविषयी सांगत असत. त्यावेळी वीणा व दिलीप यांच्या असे लक्षात आले, की आपल्या मित्रमैत्रिणींना चांगले सामाजिक काम करणा-या अशा संस्थांविषयी काहीच माहीत नाही! वीणा व दिलीप या दोघांनाही असे वाटले, की चांगले सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांची माहिती लोकांना द्यायला हवी. त्या प्रदर्शनाचे नाव ‘देणे समाजाचे’ असे ठेवले...