ताराबाई मोडक पद्मभूषण; त्यांच्या शिष्य अनुताई वाघ पद्मश्री- एकाच कार्यात गुंतलेल्या गुरुशिष्य जोडीला पद्म सन्मान मिळाल्याचे उदाहरण विरळा. त्या गुरूशिष्यांनी कोसबाड येथे बालशिक्षणविषयक अनेक प्रयोग 1956 सालापासून केले. त्यांनी त्यांच्या प्रयोगांमध्ये मॉण्टेसरी पद्धतीची शिक्षणविषयक मूलतत्त्वे घेऊन, त्यांच्या कार्यपद्धतीत फेरफार केले. शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील अशी शैक्षणिक साधने रचली. ‘कुरण शाळा’, ‘उद्योग शाळा’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे उपक्रम योजले. त्यांनी तर ‘अंगणवाडी’ व ‘बालवाडी’ या संकल्पना समाजात रुजवल्या ! ताराबाईंनी सुरू केलेल्या ‘शिक्षण पत्रिका’ मासिकाला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत...