Tag: तीर्थक्षेत्रे
घटस्थापना ते अक्षय्य तृतीया: पाणी, पाणी !
नवरात्रीत कुंभाची म्हणजे घटाची स्थापना केली जाते. त्या दिवशी तलावांची पूजा असते, तलावांच्या पाण्याचे हिशोब लावले जातात. ते पाणी येथील सजीव सृष्टीसाठी वर्षभर वापरणे आहे याची ती आठवण असते. त्याला अनुसरून पाण्याचे व्यवस्थापन ठरते. अक्षय्य तृतीयेला घटाचे दान करण्यास सांगितले आहे. ज्या समाजाजवळ भरलेला घट दान करण्याइतके पाणी शिल्लक असेल, तो समाज समृद्ध राहतो. आश्विन महिन्यातील घटस्थापनेच्या दिवशी समाजाच्या हाती असणारे पाणी काटकसरीने वापरत वापरत वैशाख महिन्यातील अक्षय्य तृतीयेपर्यंत शिल्लक ठेवावे असा तो संकेत आहे...