मधुराने लिहिल्या आहेत त्या सर्व गोष्टी सत्यच आहेत. मधुरा दहा वर्षांपूर्वी ‘जे.एन.यु.’त होती. मी तिच्या कितीतरी आधी पास आऊट झाले. मी ‘जे.एन.यु.’मध्ये राहत होते, तेव्हा जग भारतासाठी नुकते खुले होऊ लागले होते. आम्हाला घरी एस.टी.डी. फोन करायचा तर बसने जावे लागे. तो प्रवास किमान अर्ध्या तासाचा होता. मी ‘जे.एन.यु.’त प्रवेश घेण्यासाठी डॅडींबरोबर गेले. तेथे आम्ही प्रा. तलगिरी यांना भेटलो. ते त्यावेळी जर्मन भाषा केंद्राचे प्रमुख होते. डॅडी त्यांना ओळखत होते. डॅडींनी त्यांची ओळख माझ्याशी करून दिली. प्रा. तलगिरी म्हणाले, की तू तिकडे जाऊन प्रवेश घे, तोपर्यंत डॅडी मजजवळ बसतील...