Tag: जुन्नर तालुका
टेफ्रांचा पाऊस ! (Indonesion Tefra found in Junnar – Maharashtra)
कुकडी प्रकल्पात बोरी गावाच्या वरील बाजूस येडगाव व त्या पाठीमागे माणिकडोह अशी दोन धरणे बांधली गेली. त्यामुळे कुकडी नदीचे पात्र कायम वाहते होते, ते कोरडे पडले. परंतु त्या उघड्या पात्राचा फायदा असा झाला, की त्यातून आदिमानवाची सत्यकथा प्रकट झाली ! ही गोष्ट 1987 सालातील. पुण्याजवळच्या परिसरात भौगोलिक सर्वेक्षण सुरू होते. विश्वास काळे यांना बोरी गावाजवळ कुकडी नदीकाठी राखेचे आगळेवेगळे थर आढळले. तसे थर नदीकाठाने तब्बल दहा किलोमीटरच्या परिसरात पसरलेले होते. पण ती राख नव्हती, तर तप्त ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर हवेत उडालेले खनिज, सिलिका अशा द्रव्यांच्या सूक्ष्मकणांचा तो थर होता. राखेसारख्या त्या कणांना भू-शास्त्रीय भाषेत ‘टेफ्रा’ म्हणतात...
बोरी बुद्रुकचे आकर्षण सर्वांगांनी !
जुन्नर हा एकमेव पर्यटन तालुका महाराष्ट्र राज्यात मानला जातो; म्हणजे तो अनेकानेक आकर्षणांनी भरलेला आहे. तो पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कडेकपाऱ्यांत वसलेला आहे. जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी. बोरी बुद्रुक हे निसर्गसंपन्न गाव जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे. तेथे अश्मयुगाच्या खुणा सापडल्यामुळे त्या गावाच्या ऐतिहासिकतेच्या खजिन्यात अपूर्व अशी भर पडली आहे. इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे पुरावशेष डेक्कन कॉलेज यांच्या पुरातत्त्वीय संशोधनातून तेथे आढळून आले...
राजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख ! (Rajuri)
राजुरी हे कोरडवाहू गाव आहे. ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पूर्वेला आहे. तेथे वार्षिक चारशेपन्नास ते पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. शेती हा तेथील प्रमुख...
नाणेघाट – प्राचीन हमरस्त्यांचा राजा (Naneghat)
सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध...
आमटी, भाकरी आणि अणे येथील भक्तीचा उत्सव
यात्राउत्सवांतील विविधता गावागणिक बदलते. तशीच परंपरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावाने जपली आहे. रंगदास स्वामींची तपोभूमी ही त्या गावाची ओळख. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त...