स्वागत थोरात अंधांचे जगणे सुकर व्हावे, त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी द्यावी यासाठी जेथे गरज असेल, तेथे समुपदेशनासाठी जातात. अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष सराव करून घेतात. स्वागत यांनी त्या अंध बांधवांच्या मनात शिरून त्यांची प्रतिभा, बुद्धीची क्षमता ओळखून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची तिरीप दाखवली आहे…