Tag: चंदाताई तिवाडी
हमीद सय्यद : भारूडांमधून जनजागृतीचा वसा! (Hamid Sayyad- Muslim Divotee Sings Hindu Bhajans)
हमीद सय्यद हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चाळिशी ओलांडित असताना राष्ट्रीय भारूडकार होऊन गेला आहे. आकाशवाणी कलावंत तर तो आहेच. तो वारकरी सांप्रदायिक पारंपरिक भारुड सादर करून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच हुकूमत गाजवू शकतो. त्याची ती ताकद हेरून त्याचा अनेकविध प्रचारकार्यात उपयोग मुख्यत: केंद्र व राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांकडून करून घेतला जातो. हमीद सय्यद यांच्या स्वरचित भारूडांमध्ये गायन, नृत्याभिनय व चटपटीत-उद्बोधक संवाद हे वैशिष्ट्य असते...
चंदाताई तिवाडी यांचा बुर्गुंडा
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिस-या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये कलावंत आपली कला सादर करत होता. कलाकाराला नृत्य, संगीत आणि रसाळ निरुपणाची खणखणीत जाण होती. कलाकाराची पद्यामधील लयतालावर उंच उडी मारण्याची लकब प्रेक्षकांची दाद घेऊन जात होती. कलाकार लोककलेतील भारूड हा प्रकार सादर करत होता. भारूड सादर करणारा कलाकार सहसा पारंपरिक वेषातला पुरूष म्हणून अवतरतो. परंतु ही चक्क एक स्त्री होती. भारूडी चंदाताई तिवाडी!

