Tag: ग्राममंगल
बालशिक्षणातील अनुताईंचे प्रयोग ! (Anutai Wagh : Pioneering Efforts in Child Education)
अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहकारी. त्यांनी कोसबाडच्या आदिवासी भागातील बालशिक्षणाचे- ताराबाई मोडक यांचे कार्य जोमाने पुढे नेले. त्या कार्याला अनेक पदर जोडले. अनुताई यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. त्यांना मातृत्व तर सोडाच; पण विवाहितेचे सौभाग्यही क्षणिक लाभले ! मात्र अनुताईंनी आदिवासींच्या व दलितांच्या मुलांना वात्सल्याने स्वत:च्या कवेत घेतले. त्या समाजातील मुलांचे खरे शिक्षण ‘त्यांना माणसात आणण्याचे’ होते. ती मुले केवळ शिक्षणापासून वंचित नव्हती, तर त्यांचे शिक्षणाशी जणू शत्रुत्व तयार झाले होते. त्यांनी तशा मुलांच्या गळी शिक्षण उतरवण्याचा लोकविलक्षण खटाटोप केला...
शिक्षणातील क्रांतीचे पाऊल : ग्राममंगल (Grammangal- innovative educational method)
‘ग्राममंगल’च्या तीन शाळा ह्या नव्या शिक्षणपद्धतीचा ब्रँड आहेत. म्हणजे शिक्षणविषयाची ती संकल्पना जुनी आहे, पण सध्या त्यांबाबतचे औत्सुक्य वाढले आहे. त्या शाळा पाहण्याचा योग आला...
रमेश पानसे यांचे स्वप्न आणि शैक्षणिक धोरणाचे सत्य (Panase’s Dream Came True Through Educational...
प्रा. रमेश पानसे ही व्यक्ती नसून स्वतःच एक संस्था आहेत! प्रचंड ऊर्जा, उर्मी, अभ्यास, तळमळ, लोकसंग्रह, कल्पना, उत्साह हे सर्व त्या व्यक्तीजवळ आहे. बालशिक्षणात त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांना शिक्षणऋषीच म्हणता येईल. त्यांनी 2020 साली ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे...