Tag: गोरेगाव
कोलटकरांच्या भिजकी वहीची नवी आवृत्ती
अरुण कोलटकर यांच्या ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन 20 डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईतील गोरेगाव येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मध्ये रसिकांच्या गर्दीत झाले. ज्ञानपीठ सन्मानित भालचंद्र नेमाडे आणि ‘प्रास’चे जनक अशोक शहाणे हे दोघे प्रमुख पाहुणे होते. रेखा शहाणे आणि अंबरीश मिश्र यांचे नियोजन नेटके व प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते...
त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)
कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…
साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून ते त्यांच्या नावापुढे मोन्सी असे लिहितात. तो कोणाही धर्मगुरूसाठी मोठा बहुमान आहे! मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर बत्तीस पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘मधाच्या घागरी’; तसेच, त्यांनी वसई किल्ल्यांतून नेलेल्या व आता हिंदू तीर्थक्षेत्री असलेल्या अडतीस घंटांचा शोध नऊ जिल्ह्यांत जाऊन लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे...
संतोष हुलावणे आणि त्याचा ह्युमेनॉइड रोबोट
मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या व हार्डवेअर नेटवर्क इंजिनीयर असलेल्या संतोष हुलावले या पस्तीस वर्षांच्या तरुणाने भारतातील पहिला साडेसहा फुटी ह्युमेनॉइड रोबोट बनवण्याची किमया केली...