Home Tags गुरव

Tag: गुरव

गरूडपाड्याची गावकी (Garudpada model of village based civil society)

मी गावकी हा शब्दच मूळात ऐकला तो 2014 साली. आम्ही रोहा रोडवरील गरूडपाडा गावात डिसेंबर 2014 ला राहण्यास आलो. पंचावन्न-साठ घरांचे चिमुकले गाव. तोपर्यंतचे सगळे आयुष्य शहरात गेले आणि त्यातील अर्ध्याहून अधिक महानगरात घालवले, त्यामुळे ‘खेड्यातील घरा’चे स्वप्न अनुभवणे बाकी होते. गावाचे गरूडपाडा हे नाव कसे पडले, कधीपासून गाव वसले असे प्रश्न मनात आले. खरे तर, शासन दरबारी गरूडपाडा गाव अस्तित्वात नाही. समोर काविर नावाचे गाव आहे त्याचाच उल्लेख सापडतो. काविरच्या रहिवाशांची शेते या गावात होती. ते त्यासाठी येथे येत आणि ‘पाड्यावर जातो’ असा उल्लेख करत...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा जन्म

0
दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराची पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश कालीन ह्या मंदिराचा 2015 साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपुर यामुळे मंदिरा भोवतीचे वातावरण तेजोमय वाटते...

चांगभलं करणारं ‘पवतं’ (Sacred Thread for Public Good – Tradition)

0
‘पवतं’ बांधण्याची परंपरा कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावांत सुरू आहे. ‘पवतं’ म्हणजे पवित्र रक्षक धागा. हाताला गंड्याचा दोरा, कंबरेला करगोटा बांधतात तसे. पवत्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आढळतात.

गुरव म्हणजे शंकराचे पुजारी (Gurav – ShivShankar’s Speciel Priests)

गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली...