वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...